Posts

तालुका पोलीस स्टेशन आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशोदाच्या विद्यार्थ्यांचे यश

Image
तालुका पोलीस स्टेशन आयोजित   वक्तृत्व स्पर्धेत यशोदाच्या विद्यार्थ्यांचे यश महाराष्ट्र पोलीस कोल्हापूर रेंजच्या वतीने डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप अंतर्गत सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील एमबीएचा विद्यार्थी भरत कांबळे आणि त्याच्या टीमने प्रथम क्रमांक मिळविला. त्याने रॅगिंग या विषयावर मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांचा सक्रीय सहभाग, छेडाछाड, डॉल्बीमुक्त अभियान, रॅगिंग, बालक व स्त्रियांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार आणि गर्भलिंग तपासणी हे विषय देण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करावयाचे होते. तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांमधून यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील कॉलेज ऑफ एमबीएचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी भरत कांबळे याने प्रथम क्रमांक मिळविला. अभिलाष नाळे आणि कृष्णा काळे या विद्यार्थ्यांनीही त्याला सहकार्य केले. स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. त्याच्या या य...

फुटबॉल सुपरकप भारतीय संघात यशोदा ज्युनि. कॉलेजचा अद्वैत जोशी

Image
                        फुटबॉल सुपरकप भारतीय संघात                         यशोदा ज्युनि. कॉलेजचा अद्वैत जोशी वाढे फाटा येथील यशोदा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी अद्वैत जोशी याची दुबई येथे होणा-या सुपर कप 2018 साठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, प्राचार्य स्नेहल निकुंभ यांनी त्याचे अभिनंदन केले. नवी पिढी अत्यंत हुशार आणि भविष्याची जाण असलेली आहे. मिनी फुटबॉलपटू अद्वैत जोशी याच्या यशामुळे यशोदा शिक्षण संस्था आणि यशोदा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा नावलौकिक वाढला असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केले. यशोदा शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासह मुलांच्या कला व क्रीडा गुण विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना त्या त्या क्षेत्रात निपून करण्यासाठी संस्था प्रयत्न करत असल्याचे ...
                    यशोदा ख-या अर्थाने विद्यार्थ्यांचे करियर घडवते                        नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया यशोदा टेक्निकल कॅम्पस हा मुंबई पुण्यातील कॅम्पस पेक्षा चांगला कॅम्पस आहे. या कॉलेजने केवळ यशोदामधीलच नाही तर इतर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांनाही कॅम्पस मुलाखतींच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ख-या अर्थाने यशोदा विद्यार्थ्यांचे करियर घडवते हे स्पष्ट झाल्याचे मत कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये नुकत्याच पॅजिओ कंपनीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींसाठी राज्यातील 14 महाविद्यालयातील 79 विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांनी यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील शैक्षणिक वातावरणाबाबत आनंद व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ऑगस्ट 2017 मध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये चार कंपन्यांनी उपस्थिती लावून आपल्या कंपन्यांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्...
Image
                    यशोदामध्ये उंच इमारती बांधकाम तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत कमी असणारी जागा यामुळे कमी जागेत मोठी इमारत उभारण्याचे कौशल्य सिव्हिल इंजिनिअर्सना आत्मसात करावे लागणार आहे. यासाठीच यशोदामध्ये सर्वाधिक उंच आणि भक्कम इमारती कशा बनवायच्या याबाबतच्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सिव्हिल इंजिनिअर म्हणून साकारत असलेली प्रत्येक इमारत वेगळी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याप्रमाणे इमारतींचे बांधकाम केले जाते. पण, कमी जागेत आकर्षकपणे बांधलेली इमारत आपले वेगळेपण कायम दाखवत असते. यासाठीच विद्यार्थ्यांनाही कमी जागेत मोठ्या इमारती कशा बांधाव्यात याबाबतचे प्रशिक्षण मिळावे यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील रोबो कार्ट संस्थेचे ऋषिकेश पिंपळे यांनी याबाबत मुलांना मार्गदर्शन केले. उंच इमारती बनविण्याचे तंत्र आणि कौशल्य त्याबरोबरच त्यासाठी उपयोगी पडणारे सॉफ्टवेअर याबाबतही पि...

कमिन्स कंपनीकडून यशोदाला सर्वप्रकारचे सहाय्य – राव

Image
प्रथम वर्ष इंजिनअरिंग विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न व्यावसायिकतेबरोबरच सामाजिक भान जपणारी कमिन्स कंपनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही मदत करते. त्यामुळे आर्थिक अडचणीतील पण होतकरू, शिकण्याची इच्छा असलेल्या मुलांना कमिन्स मार्फत शैक्षणिक मदत केली जाईल. तसेच यशोदामधील मुलांना शिष्यवृत्ती आणि नोकरीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन टाटा कमिन्स कंपनीच्या व्यवस्थापक अवंती राव यांनी दिले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, इंजिनिअरिंगचे सहसंचालक प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. तुषार शेंडे, प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रियांका काशीद आदी उपस्थित होते. अंवती राव म्हणाल्या, सध्या इंजिनिअरिंग क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. त्याबरोबरच वेगवेगळे बदल होत आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहिले पाहिजे. बदलते तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारे ज्ञान विद्यार्थ्यांकडे असले पाहिजे. सतत शिक...

औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार क्षमताविकास आवश्यक – जाधव

Image
औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असून त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करून औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार स्वतःमध्ये कौशल्ये विकसित केली पाहिजेत असे मत जे. ए. सोल्युशन्सचे संस्थापक उद्योजक अलंकार जाधव यांनी व्यक्त केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये एमसीएच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी एमसीएच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. जयश्री भोसले, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी तुषार शेंडे उपस्थित होते. जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली कौशल्ये त्यांच्या कामातून दिसली पाहिजेत. त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये केलेले विविध प्रकल्प हे कंपनीसाठी उपयुक्त ठरले पाहिजेत. त्याबरोबरच त्या प्रकल्पांचा कंपनीच्या विकासामध्ये वाटा असला पाहिजे. नवीन प्रकल्प तयार करणे आणि त्याच्या माध्यमातून समाजाचा विकास होणे ही कंपनीची गरज असते. त्यामुळे त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या नवनवीन योजना राबविण्याचे काम त्यांच्या हातून होणे अपेक्षित आहे. एमसीएच्या विभागप्रमुख प्रा....

नवनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांकडून ध्येयनिश्चिती गरजेची – मिश्रा

Image
यशोदामध्ये डिप्लोमा प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात                          तंत्रशिक्षणासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीमध्ये आपले योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे असे आवाहन किर्लोस्कर कंपनीचे मनोजकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रॅक – रॉक कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक सोनल झिंब्रे, हर्ष अडव्हर्टायझिंगचे हर्ष झिंब्रे, यशोदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, इंजिनिअरिंग विभागाचे सहसंचालक प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे, पॉलिटेक्निकच्या उपप्राचार्य प्रा. पी. व्ही. शिंदे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी तुषार शेंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. मिश्रा म्हणाले, ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण केले तर काहीच असाध्य राहत नाह...