नवनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांकडून ध्येयनिश्चिती गरजेची – मिश्रा





यशोदामध्ये डिप्लोमा प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात

                         तंत्रशिक्षणासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीमध्ये आपले योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे असे आवाहन किर्लोस्कर कंपनीचे मनोजकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रॅक – रॉक कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक सोनल झिंब्रे, हर्ष अडव्हर्टायझिंगचे हर्ष झिंब्रे, यशोदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, इंजिनिअरिंग विभागाचे सहसंचालक प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे, पॉलिटेक्निकच्या उपप्राचार्य प्रा. पी. व्ही. शिंदे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी तुषार शेंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिश्रा म्हणाले, ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण केले तर काहीच असाध्य राहत नाही. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोनही ठेवला पाहिजे आणि त्याचा उत्तरोत्तर विकास करत राहिले पाहिजे. अलीकडच्या काळात अधिकाधिक कौशल्ये आत्मसात करून नाविण्याचा ध्यास घेणे आणि संघटनात्मक पातळीवर नियोजन करणे आवश्यक आहे.
सोनल झिंब्रे म्हणाल्या, कोणतीही गोष्ट करताना त्याबाबत आत्मीयता आणि प्रेम असले पाहिजे. तर कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही. आपण, ज्या कामावर प्रेम करतो ते काम अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूक करण्यावर जोर देतो. डिप्लोमाच्या पुढील तीन वर्षाच्या कालावधीत जेवढी कौशल्ये आत्मसात करता येतील तेवढी करण्याचा प्रयत्न करा.
प्रा. अजिंक्य सगरे म्हणाले, कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडविणे हेच यशोदाचे ध्येय आहे. एक चांगले स्वप्न उराशी बाळगून या कॅम्पसची निर्मिती केली आहे. त्यामुळे याठिकाणी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी समजून घेऊन त्याला स्वतःच्या पायावर उभे करणे आणि एक सक्षम नागरिक घडविण्याचे काम पुढील काळात यशोदामध्ये होईल.
यशोदामध्ये 31 जुलैपासून सुरू असलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबरोबरच मिस्टर फ्रेशर्स आणि मिस फ्रेशर्स या पुरस्कारानेही विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रीकल विभागाचे विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, इंजिनिअरिंग डिग्रीचे सर्व विभागांचे विभाप्रमुख, प्रथम वर्ष डिप्लोमाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे यांनी केले तर डिप्लोमाच्या उपप्राचार्य प्रा. पी. व्ही. शिंदे यांनी आभार मानले.


Comments

Popular posts from this blog

तालुका पोलीस स्टेशन आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशोदाच्या विद्यार्थ्यांचे यश

यशोदाची ऐश्वर्या उनकुले युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप वक्तृत्व स्पर्धेत प्रथम