फुटबॉल सुपरकप भारतीय संघात यशोदा ज्युनि. कॉलेजचा अद्वैत जोशी

                        फुटबॉल सुपरकप भारतीय संघात
                        यशोदा ज्युनि. कॉलेजचा अद्वैत जोशी

वाढे फाटा येथील यशोदा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी अद्वैत जोशी याची दुबई येथे होणा-या सुपर कप 2018 साठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, प्राचार्य स्नेहल निकुंभ यांनी त्याचे अभिनंदन केले.
नवी पिढी अत्यंत हुशार आणि भविष्याची जाण असलेली आहे. मिनी फुटबॉलपटू अद्वैत जोशी याच्या यशामुळे यशोदा शिक्षण संस्था आणि यशोदा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा नावलौकिक वाढला असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केले.

यशोदा शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासह मुलांच्या कला व क्रीडा गुण विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना त्या त्या क्षेत्रात निपून करण्यासाठी संस्था प्रयत्न करत असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी सांगितले.  तर विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारिरीक विकास साधण्यासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. अद्वैत जोशी याच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करून प्राचार्य स्नेहल निकुंभ यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. 

Comments

Popular posts from this blog

तालुका पोलीस स्टेशन आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशोदाच्या विद्यार्थ्यांचे यश

यशोदाची ऐश्वर्या उनकुले युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप वक्तृत्व स्पर्धेत प्रथम