यशोदामध्ये उंच इमारती बांधकाम तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न
दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत कमी असणारी जागा यामुळे कमी
जागेत मोठी इमारत उभारण्याचे कौशल्य सिव्हिल इंजिनिअर्सना आत्मसात करावे लागणार
आहे. यासाठीच यशोदामध्ये सर्वाधिक उंच आणि भक्कम इमारती कशा बनवायच्या याबाबतच्या
कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला
प्रतिसाद मिळाला.
सिव्हिल इंजिनिअर म्हणून साकारत असलेली प्रत्येक इमारत वेगळी असावी अशी
प्रत्येकाची इच्छा असते. त्याप्रमाणे इमारतींचे बांधकाम केले जाते. पण, कमी जागेत
आकर्षकपणे बांधलेली इमारत आपले वेगळेपण कायम दाखवत असते. यासाठीच
विद्यार्थ्यांनाही कमी जागेत मोठ्या इमारती कशा बांधाव्यात याबाबतचे प्रशिक्षण
मिळावे यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई
येथील रोबो कार्ट संस्थेचे ऋषिकेश पिंपळे यांनी याबाबत मुलांना मार्गदर्शन केले.
उंच इमारती बनविण्याचे तंत्र आणि कौशल्य त्याबरोबरच त्यासाठी उपयोगी पडणारे
सॉफ्टवेअर याबाबतही पिंपळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यशाळेला
विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा.
अजिंक्य सगरे आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे
यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल विभागप्रमुख प्रा. पी. व्ही. शिंदे, स्नेहल
सदावर्ते, प्रा. पी. जी. म्हेत्रस, प्रा. योगिता कदम यांनी या कार्यशाळेचे यशस्वी
आयोजन केले.
Comments
Post a Comment