यशोदा ख-या अर्थाने विद्यार्थ्यांचे
करियर घडवते
नोकरी मिळालेल्या
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
यशोदा टेक्निकल कॅम्पस हा
मुंबई पुण्यातील कॅम्पस पेक्षा चांगला कॅम्पस आहे. या कॉलेजने केवळ यशोदामधीलच
नाही तर इतर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांनाही कॅम्पस मुलाखतींच्या
माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ख-या अर्थाने यशोदा
विद्यार्थ्यांचे करियर घडवते हे स्पष्ट झाल्याचे मत कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड
झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये
नुकत्याच पॅजिओ कंपनीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींसाठी राज्यातील 14
महाविद्यालयातील 79 विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांनी यशोदा टेक्निकल
कॅम्पसमधील शैक्षणिक वातावरणाबाबत आनंद व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ऑगस्ट 2017 मध्ये यशोदा
टेक्निकल कॅम्पसमध्ये चार कंपन्यांनी उपस्थिती लावून आपल्या कंपन्यांसाठी
विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये कमिन्स, इटॉन, पॅजिओ आणि सॅन्डोज या
कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी देखील यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील
सुविधांबाबत समाधान व्यक्त केले आहे. यशोदाने केवळ आपल्या विद्यार्थ्यांपुरता
विचार न करता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना या कॅम्पस मुलाखतींमध्ये समाविष्ट
करून घेतले आहे. त्यामुळे कंपन्यांना जास्तीत जास्त मुले उपलब्ध होतात. यशोदा
टेक्निकल कॅम्पसमधील सर्वच्या सर्व मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली
आहे. त्यामुळे यापुढेही यशोदा आणि राज्यातील इतर महाविद्यालयातील मुलांनाही नोकरीची
संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे
यांनी दिले आहे.
या कॅम्पस मुलाखतींतून
पॅजिओ कंपनीने 17 मुलांची निवड केली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6
सप्टेंबर 2017 पासून नोकरीवर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.
ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट
अधिकीरी प्रा. तुषार शेंडे यांनी या कॅम्पस मुलाखतींचे आयोजन केले होते. त्यांना
कॉलेजमधून प्रा. रमीज डांगे, प्रियांका यादव आणि सोनाली चव्हाण यांनी सहकार्य
केले. तर पॅजिओ कंपनीकडून मनुष्यबळ विकास व्यवस्थापक सुयोग फुलबडवे आणि विजय कडू उपस्थित
होते.
Comments
Post a Comment