इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चरसाठी ‘ यशोदा ’ एकमेव पर्याय

      इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चरसाठी यशोदा एकमेव पर्याय
केल्याने होत आहे रे अधि केलेचि पाहिजे...यानुसार काम करणा-याला यश मिळते आणि प्रामाणिकपणाचे कौतुक होते. कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर उभ्या राहिलेल्या यशोदा शिक्षण संस्थेत सध्या के. जी. ते पी. जी. पर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली आहे. शिक्षणाविषयी असलेल्या तळमळीतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यशोदा शिक्षण संस्था कार्यरत असून या संस्थेचा झपाट्याने झालेला विकास साता-याच्या शैक्षणिक क्रांतीचाच एक भाग आहे. प्रा. दशरथ सगरे यांच्या दृष्टीकोनातून आणि प्रा. अजिंक्य सगरे यांच्या नेतृत्वातून संस्था अत्याधुनिक साधनसामग्रीसह साता-याच्या वैभवात भर टाकण्याचेच काम करत आहे.
महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा प्रभाव पडलेल्या यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी यशोदा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध शाळा  आणि महाविद्यालयांची उभारणी केली. या भक्कम पायावर संस्थेच्या मजबूत इमारती उभारण्याचे आणि त्यावर कळस चढविण्याचे काम संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे करत आहेत. यशोदा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सध्या यशोदा बाल मंदिर, प्राथमिक शाळा यशोदानगर, साधना बालविहार, साधना प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल नुने, माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल राधिकानगर, लोकनेते सुबराव कदम आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, यशोदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए, सीबीएसईचे यशोदा पब्लिक स्कूल अशा शाळा सुरू आहेत. त्यामुळे सातारा शहरामध्ये एकप्रकारे शैक्षणिक क्रांतीच झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये.
शहरापासून अत्यंत जवळ असलेला यशोदा टेक्निकल कॅम्पस हा अत्यंत रमणीय आणि महाविद्यालयीन वातावरण निर्माण करणारा कॅम्पस आहे. पुणे – मुंबईतील कॅम्पस पेक्षाही अत्यंत भव्य आणि विस्तीर्ण असलेला त्याबरोबरच विविध प्रकारची फुलझाडे आणि वृक्षवेलींनी नटलेला असा हा कॅम्पस सर्वांना आल्हाददायक वाटतो. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये सध्या पॉलिकेक्निक, इंजिनिअरिग, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए आणि एमसीए असे अभ्यासक्रम सुरू आहेत. कॅम्पसमध्ये प्रवेश करताच या कॅम्पसची भव्यता आपल्याला जाणवते. दोन्ही बाजूंनी असलेली वृक्षांची गर्द सावली आणि विविध प्रकारची फुलझाडे मन प्रसन्न करतात.
इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अण्ड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. तर पॉलिटेक्निकसाठी मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल हे विभाग आहेत. फार्मसी विभागात डी, बी आणि एम. फार्मसीचे अभ्यासक्रम सुरू आहे. तर एमबीए आणि एमसीए आपले वेगळेपण कायम जपत आले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते त्यांची उपस्थिती आणि अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याच्या कामापर्यंत संपूर्ण लक्ष दिले जाते. एवढेच नाही तर प्रत्येक शिक्षकाने 10 विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर या प्राध्यापकांची बारीक नजर असते. विद्यारर्थ्याला चांगले गुण मिळण्याबरोरच त्याच्या नोकरीपर्यंतची सर्व जबाबदारी महाविद्यालय घेत आहे. यावर्षी सुमारे दीडशे मुलांना नोकरीच्या संधी संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेली असते. हे यशोदा शिक्षण संस्थेचे वैशिष्ट्य आहे.
विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसचा संपूर्ण परिसर वायफाय आहे. याठिकाणी प्रशस्त लायब्ररी आहे तर चोवीस तास खुली असलेला स्टडी रूम देखील आहे. याठिकाणी कितीही वेळ विद्यार्थी अभ्यास करत बसू शकतात. त्याबरोबरच त्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीला देखील संधी मिळते. वेगवेळ्या संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले जाते. सुमारे 500 हून अधिक संगणक असलेली लॅब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. अत्याधुनिक साधने, क्रीडा कौशल्यासाठी सर्व प्रकारच्या वस्तू, आर्चरी, शुटींग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल कोर्ट, बॅडमिंटन, कबड्डी, खो - खो हे आऊटडोअर गेम आणि बुद्धिबळ, कॅरम यासारख्या खेळांसाठीही शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय साता-याच व्हावी या उद्देशाने याठिकाणी सुरू असलेल्या के. जी. ते पी. जी. अभ्यासक्रमासाठी बाहेर गावच्या मुलांचाही ओढा वाढू लागला आहे. त्यामुळेच यावर्षी यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये सुमारे 350 मुलींचे आणि 150 मुलांचे भव्य वसतीगृह बांधण्यात आले आहे. याठिकाणी संस्थेच्या वतीने मेस चालविण्यात येणार असून मुलांना कमी खर्चात जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सामाजिक भान म्हणून एससी आणि एसटीच्या मुलांना मोफत निवासाची व्यवस्थाही संस्थेच्या वतीने चालू वर्षापासून करण्यात येत आहेत. अत्यंत आकर्षक आणि निसर्गरम्य परिसरात हे वसतिगृह उभारण्यात येत आहे.
सातारा शहरातील सर्वात जवळचे आणि अत्यंत सुसज्ज असे आर्किटेक्चर कॉलेजही आता साता-यामध्ये तयार झाले आहे. याठिकाणी नाटाचे केंद्रही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुलांना आता पुणे, मुंबई किंवा कोल्हापूरला जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. एमबीएच्या मुलांसाठी अत्यंत प्रशिक्षित आणि पीएच. डी. असलेले प्राध्यापक मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील नोकरीचा मार्ग यशोदामधूनच जाणार आहे. कारण संस्थेच्या नावातच यश आहे.

सध्या के. जी. पासून पदवी आणि पदव्युत्तर वर्गासाठी प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे केवळ पुणे, मुंबईच्या नावाला भूलून आणि आर्थिक खर्चाचा डोंगर स्वतःवर ओढून घेण्यापेक्षा एकदा यशोदा टेक्निकल कॅम्पसला भेट द्या, या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि लॅब पहा त्यानंतरच निर्णय घ्या. केवळ मुंबई आणि पुण्यात शिकल्यानंतरच चांगली नोकरी मिळते असे नाही त्यामुळे याठिकाणी देखील तुम्हाला खूप चांगल्या सुविधा पहायला मिळतील. विद्यार्थ्यांशी एकरूप झालेले प्राध्यापक त्यांची काळजी घेणारे आणि अभ्यासात मदत करणारे आपलेपणा असलेले लोक यशोदा कुटुंबात सापडतील. विद्यार्थी आणि प्राध्यापक या सर्वांच्या आपलेपणातूनच यशोदा कुटुंब मोठे होत आहे. त्यामुळेच भविष्यात याठिकाणी वैद्यकीय अभ्यासाची गरज भागविणारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे सातारा शहराच्या दृष्टीने ती शैक्षणिक क्रांतीच ठरेल या शंका नाही. 
दीपक शिंदे
संचालक, संवाद व जनसंपर्क
यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा

Comments

Popular posts from this blog

तालुका पोलीस स्टेशन आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशोदाच्या विद्यार्थ्यांचे यश

यशोदाची ऐश्वर्या उनकुले युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप वक्तृत्व स्पर्धेत प्रथम