यशोदाची ऐश्वर्या उनकुले युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप वक्तृत्व स्पर्धेत
यशोदाची ऐश्वर्या उनकुले प्रथम
डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत सातारा तालुका पोलीस स्टेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील कम्प्युटर इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी ऐश्वर्या दीपक उनकुले हिने प्रथम क्रमांक मिळविला.
येथील सातारा तालुका पोलीस स्टेशनच्यावतीने 2017 -18 या शैक्षणिक वर्षात 4 मार्च रोजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ऐश्वर्या उनकुले हिने महिलांवरील अत्याचार या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. त्याबद्दल तिला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, संचालक प्रा. डॉ. आर. जे. डायस, सह संचालक प्रा. डॉ. बी. बी. जैन, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. एस. आर. जाधव, रजिस्ट्रार गणेश सुरवसे, कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. सुरज नलवडे आदींनी अभिनंदन केले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

तालुका पोलीस स्टेशन आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशोदाच्या विद्यार्थ्यांचे यश