Posts

Showing posts from August, 2017

कमिन्स कंपनीकडून यशोदाला सर्वप्रकारचे सहाय्य – राव

Image
प्रथम वर्ष इंजिनअरिंग विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न व्यावसायिकतेबरोबरच सामाजिक भान जपणारी कमिन्स कंपनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही मदत करते. त्यामुळे आर्थिक अडचणीतील पण होतकरू, शिकण्याची इच्छा असलेल्या मुलांना कमिन्स मार्फत शैक्षणिक मदत केली जाईल. तसेच यशोदामधील मुलांना शिष्यवृत्ती आणि नोकरीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन टाटा कमिन्स कंपनीच्या व्यवस्थापक अवंती राव यांनी दिले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, इंजिनिअरिंगचे सहसंचालक प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. तुषार शेंडे, प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रियांका काशीद आदी उपस्थित होते. अंवती राव म्हणाल्या, सध्या इंजिनिअरिंग क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. त्याबरोबरच वेगवेगळे बदल होत आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहिले पाहिजे. बदलते तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारे ज्ञान विद्यार्थ्यांकडे असले पाहिजे. सतत शिक...

औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार क्षमताविकास आवश्यक – जाधव

Image
औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असून त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करून औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार स्वतःमध्ये कौशल्ये विकसित केली पाहिजेत असे मत जे. ए. सोल्युशन्सचे संस्थापक उद्योजक अलंकार जाधव यांनी व्यक्त केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये एमसीएच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी एमसीएच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. जयश्री भोसले, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी तुषार शेंडे उपस्थित होते. जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली कौशल्ये त्यांच्या कामातून दिसली पाहिजेत. त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये केलेले विविध प्रकल्प हे कंपनीसाठी उपयुक्त ठरले पाहिजेत. त्याबरोबरच त्या प्रकल्पांचा कंपनीच्या विकासामध्ये वाटा असला पाहिजे. नवीन प्रकल्प तयार करणे आणि त्याच्या माध्यमातून समाजाचा विकास होणे ही कंपनीची गरज असते. त्यामुळे त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या नवनवीन योजना राबविण्याचे काम त्यांच्या हातून होणे अपेक्षित आहे. एमसीएच्या विभागप्रमुख प्रा....

नवनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांकडून ध्येयनिश्चिती गरजेची – मिश्रा

Image
यशोदामध्ये डिप्लोमा प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात                          तंत्रशिक्षणासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीमध्ये आपले योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे असे आवाहन किर्लोस्कर कंपनीचे मनोजकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रॅक – रॉक कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक सोनल झिंब्रे, हर्ष अडव्हर्टायझिंगचे हर्ष झिंब्रे, यशोदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, इंजिनिअरिंग विभागाचे सहसंचालक प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे, पॉलिटेक्निकच्या उपप्राचार्य प्रा. पी. व्ही. शिंदे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी तुषार शेंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. मिश्रा म्हणाले, ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण केले तर काहीच असाध्य राहत नाह...