Posts

Showing posts from December, 2017

तालुका पोलीस स्टेशन आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशोदाच्या विद्यार्थ्यांचे यश

Image
तालुका पोलीस स्टेशन आयोजित   वक्तृत्व स्पर्धेत यशोदाच्या विद्यार्थ्यांचे यश महाराष्ट्र पोलीस कोल्हापूर रेंजच्या वतीने डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप अंतर्गत सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील एमबीएचा विद्यार्थी भरत कांबळे आणि त्याच्या टीमने प्रथम क्रमांक मिळविला. त्याने रॅगिंग या विषयावर मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांचा सक्रीय सहभाग, छेडाछाड, डॉल्बीमुक्त अभियान, रॅगिंग, बालक व स्त्रियांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार आणि गर्भलिंग तपासणी हे विषय देण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करावयाचे होते. तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांमधून यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील कॉलेज ऑफ एमबीएचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी भरत कांबळे याने प्रथम क्रमांक मिळविला. अभिलाष नाळे आणि कृष्णा काळे या विद्यार्थ्यांनीही त्याला सहकार्य केले. स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. त्याच्या या य...

फुटबॉल सुपरकप भारतीय संघात यशोदा ज्युनि. कॉलेजचा अद्वैत जोशी

Image
                        फुटबॉल सुपरकप भारतीय संघात                         यशोदा ज्युनि. कॉलेजचा अद्वैत जोशी वाढे फाटा येथील यशोदा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी अद्वैत जोशी याची दुबई येथे होणा-या सुपर कप 2018 साठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, प्राचार्य स्नेहल निकुंभ यांनी त्याचे अभिनंदन केले. नवी पिढी अत्यंत हुशार आणि भविष्याची जाण असलेली आहे. मिनी फुटबॉलपटू अद्वैत जोशी याच्या यशामुळे यशोदा शिक्षण संस्था आणि यशोदा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा नावलौकिक वाढला असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केले. यशोदा शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासह मुलांच्या कला व क्रीडा गुण विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना त्या त्या क्षेत्रात निपून करण्यासाठी संस्था प्रयत्न करत असल्याचे ...