Posts

Showing posts from July, 2017
Image
विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची आस आवश्यक – मकरंद कुलकर्णी यशोदामध्ये उद्योजक - विद्यार्थी संवाद कार्यशाळा औद्योगिक क्षेत्रामध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि नवनिर्मितीची आस असली पाहिजे. असे विद्यार्थी भविष्यात कधीही मागे रहात नाहीत आणि देशाच्या जडणघडणी आपले योगदान देतात. यशोदामधील विद्यार्थ्यांमध्ये मला ते गुण दिसत असल्याचे मत इर्मसन क्लायमेंट टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. चे संचालक मकरंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये उद्योजक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद वाढावा तसेच उद्योगाच्या गरजा समजून घेण्यासाठी आयोजित उद्योजक – विद्यार्थी संवाद कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी यशोदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, इंजिनिअरिंग विभागाचे प्राचार्य प्रा. डॉ. अनिरुद्ध महात्मे, इमर्सनचे वरिष्ठ व्यवस्थापक उमेश जाधव, यशोदाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. तुषार शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. इर्मसनचे मकरंद कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ शिकण्यापेक्षा समजून घेणे आवश्यक आहे. आपण किती शिकलो यापेक्षा किती...